Skip to main content

Featured post

Happy birthday wishes in marathi for brother - brother quotes in marathi

Hello friends, today we shall see Happy birthday wishes in marathi for brother . Brother , some peoples calls a carbon copy of our self. We have collected all best birthday wishes for your brother in marathi text. Please share this post with your loved one to wish them happy birthday. “आपल्याला आयुष्यात सुख, शांती, सुसंवाद, आरोग्य आणि संपत्ती मिलो। आपल्याला जीवनात हव्या असलेल्या सर्व गोष्टी देव तुम्हाला देवो. हीच ईश्वर चरणी प्रार्थना करुन तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे, तुला उदंड आयुषय लाभो, मनी हाच ध्यास आहे, यशस्वी हो औकषवंत हो, अनेक आशीर्वादा सह, वाढदविसाच्या अनेक शुभेच्छा। birthday wishes for brother in marathi माझ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आयुष्यासाठी माझा अंगभूत सर्वोत्तम मित्र बनल्याबद्दल धन्यवाद. आपल्या या खास दिवसाचा आनंद घ्या! हां वर्षातून एकदाच येते! सप्तरंगी इन्द्रधनुचि, प्रतिमा तुमचे जीवन प्रत्येकाच्या रंगात रंगुनी, जपता त्याचे मन असात सदैव वसंत ॠतू, फूलो तुमच्या अंगणी याच शुभेच्छा आमच

Raygad fort information in marathi

Raygad fort have its own story and have significant role in history of marathas. The chatrapati shivaji maharaj also died on this fort. This fort is the symbol of Swarajya. In this post we shall learn raigad fort in maharashtra information in marathi


 
स्वराज्याला प्रारंभ केल्यापासून महाराजांचे वास्तव्य मुख्यत: राजगडावरच होते. राजगड हाच स्वराज्याच्या राजधानीचा किल्ला करावा असे त्यांच्या मनात होते , म्हणूनच राजगडाचा वापर राजधानी सारखाच सुरू झाला. (इ. १६४६ पासून) त्या वेळेपासूनच राजगडाच्या तीनही माची आणि बालेकिल्ला बांधकामाने सजू लागल्या. सुवेळा , संजीवनी आणि पद्मावती अशी या तीन माचींची नावे. एवढी उत्कृष्ट बांधकामे महाराष्ट्रातील कोणत्याही एकाच किल्ल्यावर सापडणार नाहीत. राजगड केवळ अजिंक्य होता.

वास्तविक स्वराज्याचे राज्यकारभारातील वेगवेगळे भाग सपाट प्रदेशावरती असणे हे राजाच्या प्रजेच्या आणि राज्याच्या दळणवळणाच्या दृष्टीने जेवढे सपाटीच्या शहरात सोईचे होतात , तेवढे उंचउंच डोंगरमाथ्यावर होऊ शकत नाहीत. पण असे शहरात सपाटीवर राजधानी करणे क्रांतीच्या प्रारंभ काळात धोक्याचेही असते. शत्रू केव्हा झडप घालील आणि ऐन राजधानीलाच कधी धोका पोहोचेल याचा नेम नसतो. म्हणून उंच शिखरावर तटबंदीने अजिंक्य बनविलेल्या किल्ल्यावर राजधानी असणे गरजेचेच असते. राजगडचे बांधकाम सुमारे १० वषेर्ं चालले होते. जगातील उत्कृष्ट अशा डोंगरी लष्करी किल्ल्यात राजगडाचा समावेश करावा लागेल.
इ. स. १६४६ पासून ते आग्ऱ्याहून सुटकेपर्यंत स्वराज्याची राजधानी राजगड होती. अद्यापीही होतीच की , पण मिर्झाराजा जयसिंग आणि दिलेरखान यांची स्वारी आली तेव्हा महाराजांच्या प्रत्ययास एक गोष्ट आली की , मोगलांचे लष्कर राजगडाच्या पायथ्यापर्यंत घुसण्याचा प्रयत्न करीत आहे.
रायकरण सिसोदिया , दाऊतखान कुरेशी , सर्फराजखान इत्यादी मोगली सरदार राजगडाच्या उत्तरेस असलेल्या मावळात , म्हणजेच गुंजण मावळ आणि कानद मावळ या भागांत विध्वंसन करण्यासाठी मुसंड्या मारताहेत. या मोगली सरदारांनी प्रत्यक्ष राजगडावर हल्ले चढविले नाहीत. मोचेर् लावले नाहीत किंवा वेढा घालून बसण्याचेही प्रयत्न केले नाहीत. तशी एकही नोंद सापडत नाही. तरीही मोगली शत्रू राजधानीच्या पायथ्यापर्यंत येऊन जातो ही गोष्टही फार गंभीर होती. म्हणून महाराजांनी राजधानीचे ठिकाणच बदलावयाचा विचार सुरू केला.
नवी राजधानी कुठे करायची म्हटले , तरी ती डोंगरी किल्ल्यावरच करावी लागणार हे उघड होतं. जेव्हा कधी पुढे स्वराज्याचा सपाट प्रदेशावरतीही विस्तार होईल , तेव्हा एखाद्या शहरांत राजधानी करणे थोडे सोईचे ठरेल. पण जोपर्यंत उत्तर , पूर्व आणि दक्षिण या बाजूंना बादशाही अंमल अगदी लागून आहे , तोपर्यंत डोंगरातून बाहेर येणे आणि राजधानी स्थापणे हे धाडसाचे आणि लष्करी जबाबदारी वाढविणारे ठरेल.
म्हणून महाराजांनी राजधानीचा विचार नवीन केला. त्यांचे लक्ष रायगडावरच खिळले. कोकणच्या बाजूने समुदापर्यंत मराठी स्वराज्याचा विस्तार झालेला होता. रायगड उंच पर्वतावर असूनही विस्ताराने प्रचंड आणि संरक्षणाच्या दृष्टीने केवळ अजिंक्य होता.
Raigad killa information in marathi
आणि महाराजांनी ‘ राजधानी ‘ करण्याच्या दृष्टीने रायगडावर बांधकामे सुरू केली. त्यांनी रायगड राजधानी केली. यात त्यांची युद्धनेता या दृष्टीने अधिकच ओळख चांगल्याप्रकारे इतिहासाला होते.
रायगड सर्व बाजूंनी सह्यशिखरांनी गराडलेला आहे. एका इंग्रजाने या रायगडावर असा अभिप्राय व्यक्त केला आहे की , ‘ रायगडसारखा अजिंक्य किल्ला जगाच्या पाठीवर दुसरा नाही. ‘ दुसऱ्या एका इंग्रजाने रायगडाला ‘ त्नद्बड्ढह्मड्डद्यह्लश्ाह्म श्ाद्घ ह्लद्धद्ग श्वड्डह्यह्ल ‘ असे म्हटले आहे. हेन्री ऑक्झिंडेन , ऑस्टीन , युस्टीक इत्यादी अनेक पाश्चात्य मंडळींनीही रायगडचा डोंगरी दरारा आपापल्या शब्दांत लिहून ठेवला आहे.
हिराजी इंदुलकर या नावाचाही एक उत्कृष्ट दुर्गवास्तुतज्ज्ञ महाराजांच्या हाताशी होता. महाराजांनी याच हिराजीला राजधानीच्या रुपाने रायगडची बांधकामे सांगितली. यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता रायगडाच्या म्हणजेच राजधानीच्या बेलाग सुरक्षिततेचा. त्या दृष्टीने रायगड सजू लागला. रायगड किती बलाढ्य आहे , हे प्रत्यक्ष पाहिल्यानंतर खरे लक्षात येते.
हळूहळू एकेक राज्यकारभाराचा विभाग राजगडावरून रायगडावर दाखल होऊ लागला. पुढे इ. १६७४ मध्ये महाराज प्रत्यक्ष ‘ सिंहासनादिश्वर छत्रपति ‘ झाले ते याच रायगडावर. त्यावेळी हिराजी इंदुलकरानी जी काही बांधकामे गडावर केली , त्याची नोंद एका शिलालेखात कोरली. हा शिलालेख आजही रायगडावर श्रीजगदीश्वर मंदिराच्या बाहेर आहे. तेथेच देवळाच्या पायरीवर त्याने पुढील शब्द कोरले आहेत.
‘ सेवेचे ठाई तत्पर हिराजी इंदुलकर ‘
रायगडावर चढून जाण्याची वाट अरुंद आणि डोंगरकड्याच्या कडेकडेने वर जाते. त्यामुळे चढणाऱ्याला धडकीच भरते. वर चढत असताना डावीकडे खोल खोल दऱ्या आणि उजवीकडे सरळसरळ कडा. असे हे बांधकाम गडाच्या माथ्यापर्यंत करताना केवढे कष्ट पडले असतील , याची कल्पनाही नेमकी येत नाही.
अशा उंच गडावर चिरेंबदी दरवाजे , बुरुज , चोरवाटा आणि संरक्षक मोचेर् पाहिले की , हिराजीने भीमाच्या खांद्यावर जणू चक्रव्यूहच रचला असे वाटते. त्याने एक सुंदर वास्तू , एक बलाढ्य लष्करी वास्तू आणि तेवढीच मोलाची कला , संस्कृती , विविध शास्त्रे यांची ‘ रायगड ‘ ही सरस्वती नगरीही उभी केली. हिराजी इंदुलकर हा निष्णात लष्करी वास्तुतज्ज्ञ होता स्वत: महाराज.

जय भवानी
  जय शहाजीराजे                            
            जय जिजाऊ
                 जय शिवराय
                      जय शंभुराजे

 Please share this "raigad fort in maharashtra information in marathi" with your friends and family

Also check

Shivaji maharaj status in marathi
Marathi quotes on mother 

Popular posts from this author

96 kuli maratha in marathi

96 kuli maratha list in marathi मराठा समाजाची सर्व ९६ कुळे..त्यांच्या पूर्ण इतिहाससह...नक्की वाचा..! भाग-१ भाग-१ : मराठा समाजाची सर्व ९६ कुळे..त्यांच्या पूर्ण इतिहाससह...नक्की वाचा..! This post is translation of english to marathi. 96 kuli maratha surnames list in marathi.  If you found any mistake please inform us and double check for more information , 96 kuli maratha list  खालील post मध्ये ज्या ९६ कुळी मराठा 96 kuli Maratha "आडनावांचा" समावेश आहे.. त्यामध्ये अनेक आडनावे नाहीत तर कारण असे कि, या आडनावांचे अनेक उप-प्रकार आहेत..त्यामध्ये त्यांचा समावेश आहे..खाली सर्व माहिती दिली आहे..आवर्जून वाचा.. त्यामध्ये आडनावाशिवाय इतर त्यांचे साम्राज्य.गोत्र,कार्य,कुलदैवत..आदी माहिती दिली आहे.. "इतिहास जाणण्याची उत्सुकता असेल तर नक्की आपले आडनाव शोधा...माहिती भेटेल...” henna designs for hands कुळ प्रणालीची उत्पत्ती मुख्य वसाहती आणि त्यांच्या उप-कुळे किंवा रेषा वेळोवेळी वेगळे असतात आणि पुस्तकाने पुस्तक. काही गटांनी आपली वैभव आणि राज्य गमावले

96 kuli maratha list

96 kuli maratha list or 96 kuli maratha surname list  ९६ कुळी मराठा मराठा समाजाची सर्व ९६ कुळे..त्यांच्या पूर्ण इतिहाससह...नक्की वाचा..! भाग-१ भाग-१ : मराठा समाजाची सर्व ९६ कुळे..त्यांच्या पूर्ण इतिहाससह...नक्की वाचा..! खालील  post  मध्ये ज्या  ९६ कुळी मराठा  "आडनावांचा" समावेश आहे.. त्यामध्ये अनेक आडनावे नाहीत तर कारण असे कि ,  या आडनावांचे अनेक उप-प्रकार आहेत..त्यामध्ये त्यांचा समावेश आहे..खाली सर्व माहिती दिली आहे..आवर्जून वाचा.. त्यामध्ये आडनावाशिवाय इतर त्यांचे साम्राज्य.गोत्र , कार्य , कुलदैवत..आदी माहिती दिली आहे.. " इतिहास जाणण्याची उत्सुकता असेल तर नक्की आपले आडनाव शोधा...माहिती भेटेल. ..” Check  96 kuli maratha in marathi

Shivaji maharaj death reason in marathi

shivaji maharaj death was the black day for maratha empire. Hi all of you, we have heard that shivaji maharaj dead on raygad but no one knows the reason of shivaji maharaj death. In this post we shall describe  shivaji maharaj death reason in marathi शिवरायाचा मृत्यु कि खून ? संभाजीराजे आणि सोयराबाई यांचे नातेसंबंध :- १. सत्ताप्राप्तीसाठी शिवरायांचे कुटुंबात कोणत्याही प्रकारचा संघर्ष नव्हता. सोयराबाईनी संभाजीराजांना शेवटपर्यंत स्व:पुत्रा प्रमाणे सांभाळले. तर संभाजीराजे सोयराबाईना नेहमी " निर्मल मनाची आई " असे म्हणत. २. सोयराबाई व शंभूराजे यांचे भांडण लावायचा प्रयत्न ब्राह्मण मंत्र्यांनी केला. पण त्यात त्यांना यश आहे नाही. या उलट संभाजीराज्यांनी स्वराज्याचे वाटणीस विरोध केला. ३. राजाराम यांना राजसाबाई यांचे पोटी पुत्र रत्न झाले . तेव्हा राजाराम यांनी पुत्राचे नाव संभाजी असे ठेवले ( १६९७ ) जर संभाजी व राजाराम यानमध्ये संघर्ष असता तर राजाराम यांनी मुलाचे नाव संभाजी असे ठेवले असते का ?     Check  96 kuli maratha list in marathi How chhatrapati