Skip to main content

Featured post

Happy birthday wishes in marathi for brother - brother quotes in marathi

Hello friends, today we shall see Happy birthday wishes in marathi for brother . Brother , some peoples calls a carbon copy of our self. We have collected all best birthday wishes for your brother in marathi text. Please share this post with your loved one to wish them happy birthday. “आपल्याला आयुष्यात सुख, शांती, सुसंवाद, आरोग्य आणि संपत्ती मिलो। आपल्याला जीवनात हव्या असलेल्या सर्व गोष्टी देव तुम्हाला देवो. हीच ईश्वर चरणी प्रार्थना करुन तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे, तुला उदंड आयुषय लाभो, मनी हाच ध्यास आहे, यशस्वी हो औकषवंत हो, अनेक आशीर्वादा सह, वाढदविसाच्या अनेक शुभेच्छा। birthday wishes for brother in marathi माझ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आयुष्यासाठी माझा अंगभूत सर्वोत्तम मित्र बनल्याबद्दल धन्यवाद. आपल्या या खास दिवसाचा आनंद घ्या! हां वर्षातून एकदाच येते! सप्तरंगी इन्द्रधनुचि, प्रतिमा तुमचे जीवन प्रत्येकाच्या रंगात रंगुनी, जपता त्याचे मन असात सदैव वसंत ॠतू, फूलो तुमच्या अंगणी याच शुभेच्छा आमच

Shivaji maharaj death reason in marathi

shivaji maharaj death was the black day for maratha empire. Hi all of you, we have heard that shivaji maharaj dead on raygad but no one knows the reason of shivaji maharaj death. In this post we shall describe shivaji maharaj death reason in marathi

शिवरायाचा मृत्यु कि खून ?
संभाजीराजे आणि सोयराबाई यांचे नातेसंबंध :-


१. सत्ताप्राप्तीसाठी शिवरायांचे कुटुंबात कोणत्याही प्रकारचा संघर्ष नव्हता. सोयराबाईनी संभाजीराजांना शेवटपर्यंत स्व:पुत्रा प्रमाणे सांभाळले. तर संभाजीराजे सोयराबाईना नेहमी " निर्मल मनाची आई " असे म्हणत.


२. सोयराबाई व शंभूराजे यांचे भांडण लावायचा प्रयत्न ब्राह्मण मंत्र्यांनी केला. पण त्यात त्यांना यश आहे नाही. या उलट संभाजीराज्यांनी स्वराज्याचे वाटणीस विरोध केला.


३. राजाराम यांना राजसाबाई यांचे पोटी पुत्र रत्न झाले . तेव्हा राजाराम यांनी पुत्राचे नाव संभाजी असे ठेवले ( १६९७ ) जर संभाजी व राजाराम यानमध्ये संघर्ष असता तर राजाराम यांनी मुलाचे नाव संभाजी असे ठेवले असते का ?    Check 96 kuli maratha list in marathi
How chhatrapati shivaji maharaj was killed?  but why?

शिवरायांचा खून  का व  कसा झाला :--

 हजारो वर्षांची ब्राह्मनी दादागिरी शिवाजीराजे व संभाजीराजे यांनी संपवली त्यामुळे ब्राह्मण आतून प्रचंड चिडले. म्हणून त्यांनी राज्यांचे कुटुंबात भांडण लावण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.

अपयश आले तरी मोरोपंत, अण्णाजी, राहुजी सोमनाथ थांबले नाहीत. शिवरायांना संपवायचेच हा पक्का निश्चय त्यांनी केला होता. आण्णाजी दत्तो  रायगडाच्या पायथ्याशी पाचाडला थांबला होता. गडावर राहुजी सोमनाथ हा ब्राह्मण अधिकारी होता. रायगडाची संपूर्ण  नाकाबंदी करण्यात आली. कसल्याही प्रकारचा सुगावा लागणार नाही याची दक्षता या तिघांनी घेतली. म्हणून या कटाचा संशय येऊ नये यासाठी मोरोपंत आणि अण्णाजी दत्तो घटनास्थळा पासून दूर थांबले होते. हत्त्या करण्याचा कट रचणारे, प्रवृत्त करणारे जवळ थांबत नसतात. या प्रसंगी राज्यातील अत्यंत महत्वाची माणसे गडावर नव्हती. संभाजीराजे पन्हाळा गडावर होते. सेनापती हंबीरराव माहिते हे तळबीड या ठिकाणी होते. ते राजगड    पासून २५० किलोमीटर आहे. शिवाजी महाराज यांचे कुटुंबातील सर्व नातेवाईक हे पाचाडला होते. असा स्पष्ट उल्लेख शिवभारतमध्ये आहे. (  संदर्भ :- वा.सी.बेंद्रे लिखित श्री. छ. संभाजी महाराज )Shivaji maharaj death reason in marathi
shivaji maharaj death date  3 april 

 तीन एप्रिलचा ( 3 april ) दिवस उजाडला तेव्हा शिवरायांचे भोवती ब्राहामानांचेच वलय होते. राहुजी सोमनाथने गडावरचे सर्व दरवाजे बंद केले. गडाची सर्व सूत्रे सोमनाथच्या ताब्यात होती. या सार्या परिस्थितीचा फायदा घेऊन  शिवरायांवर विषप्रयोग झाला. संभाजीराजे व सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना राज्यांचे खुनाची माहिती समजणार नाही याची खबरदारी घेण्यात आली. राज्यांचा अंत्यविधी हा घाई घाईत उरकण्यात आला.


दहा  वर्षाच्या राजारामला सिंहासनावर बसउन ब्राह्मण मंत्री सत्ता ताब्यात घेउ इच्छित होते. म्हणून त्यांनी दहा वर्षाच्या राजारामाच्या राज्याभिषेकाची बातमी फुटू न देता राज्याभिषेक उरकला. शिवरायांचा खून व राजाराम यांचा झालेला राज्याभिषेक चोरून लपउन केला गेला. हि बातमी रायगडावरून फुटणार नाही याची दखल घेतली गेली. लगेच ब्राह्माण मंत्र्यांनी संभाजीराजे यांना पकडण्याचे ( अटक) करण्याचे आदेशपत्र हंबीरराव मोहिते यांना दिले.... पण हंबीरराव यांना शिवरायांनी खाजगीत संभाजीला छत्रपती करा असे सांगितले होते. राजाराम हा दहा वर्षाचा आहे त्याला राजाकरणे हे स्वराज्य ब्राह्मण मंत्र्यांचे हातात देणे होईल अशी सूचना शिवरायांनी पूर्वीच " राजारामाचे सख्खे मामा सेनापती हंबीरराव मोहिते " यांना केली होती. हंबीरराव यांना ब्राह्माण मंत्र्यांचे पत्रं मिळताच त्यांनी संभाजीराजे यांना त्याची माहिती कळवली.

वरील प्रसंग सिद्ध करतो कि सोयराबाई यांचा सख्खा भाऊ हा स्वतःच्या भाच्याला छत्रपती करायची संधी डावलून स्वराज्याचे हित पाहतो. पहा नीट पहा विचार करा सोयराबाईया संभाजी विरोधक नव्हत्या याचा हा पुरावा नव्हे काय ? तरीही हा खून सोयराबाई यांनी केला अशी अफवा  ब्राह्मणी इतिहासकारांनी नंतर उठवली.

जेव्हा शिवरायांचा खून झाला तेव्हा राज्यांचे वय हे अवघे ५०  वर्ष होते. राज्यांना कोणताही असाध्य रोग नव्हता. ते प्रधीर्ग आजारी नव्हते. राज्यांची प्रकृती निरोगी होती. वयाचे ५० व्या वर्षी राज्यांना अनैसर्गिक मृत्त्यू येणे कदापीही शक्य नाही.


how shivaji maharaj death in marathi

शिवरायांच्या मृत्त्यू बाबद संशय निर्माण करणाऱ्या काही बाबी :--
१. शिवरायांचे धर्म परिवर्तनाचे कार्य.
२. शिवरायांनी  ब्राह्मणी वर्चस्वाला दिलेला शह.
३. रायगडावरील ब्राह्मण मंत्र्यांचा अंतर्गत विरोध.
४. तीन एप्रिलचे गडावरील संशयास्पद वातावरण.
५. शिवरायांचा घाई घाईत उरकण्यात आलेला अंत्यविधी.
६. पराक्रमी, विद्वान,चारित्र्यसंपन्न, जेष्ठपुत्र संभाजीराजे यांना धोका देऊन कोणतीही चूक नसताना कैद करायचे आदेश देऊन.... दहा वर्षाच्या कनिष्ठ राजारामला घाई घाईत छत्रपती करण्यामागचा ब्राह्माण मंत्र्यांचा हेतू काय असावा ?
७. शिवरायांच्याखुनाची, राजारामाच्या राज्याभिषेकाची, माहिती गोपनीय  ठेवण्या माघे ब्राह्माण मंत्र्यांचा  काय हेतू होता ?
८. संभाजी महाराजांचे सांत्वन  करण्यापेक्षा त्यांना अटक करायला गेलेले ब्राह्मणमंत्री यांचा हेऊ काय होता ?
9. या सार्या प्रकारा नंतर संभाजीराजे यांनी सोयराबाई यांना मान दिला, गौरवले व राजाराम महाराज यांना प्रेमाने वागवले....... तर ब्राह्माण मंत्री यांना कैद केले व पुढे त्यांना हातीचे पायाखाली देऊन ठार केले. हे काय दर्शवते


               संभाजी महाराज यांना अटक करा व आम्हाला वाटेत भेटा असे आदेश ब्राह्माण मंत्र्यांनी हंबीरराव मोहिते यांना दिले होते .पण संभाजी महाराज यांना कपटाने   कैद करायला निघालेल्या मंत्र्यांना ( मोरोपंत, अण्णाजी, प्रल्हादपंत..) हंबीरराव यांनी वाटेतच अटक केले ! त्यानंतर संभाजीराजे हे रायगडावर आले त्यांनी सर्व मातांचे सांत्वन केले.


सोयराबाई या निर्दोष होत्या हे सिद्ध करणारा एक भक्कम पुरावा म्हणजे  संभाजीराजे २४ ऑगस्ट १६८० रोजी म्हणतात कि ' सोयराबाई या स्फटिका सारख्या निर्मल मनाच्या आहेत'. याचा अर्थ सोयराबाई या निर्दोष तर होत्याच पण त्या संभाजीराजे यांना आदर स्थानी होत्या.  कुमंत्र्यांनीच सोयराबाई यांना संभाजी विरोधात भडकवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. [संधर्भ छ. संभाजी (पान २२१ ) वा. सी बेंद्रे.]

  आता आपण शिवरायांचे मृत्युबाबत देशी आणि परदेशी साधनांचा विचार करू :--पुढील संदर्भ साधनांची चिकित्सा करताना त्या साधनांचा काळ व कर्ता याचा विचार केलेला आहे. मराठी आणि संस्कृत साधनांचे लेखक हे ब्राह्मण या एकाच जातीचे असल्याने सत्यशोधनात अडचणी येतात. तरी देखील अपराधीपणाची जाणीव त्या साधनात सापडते.shivaji death reason
shivaji maharaj death reason

सुरवातीला आपण अमराठी साधने पाहूयात ......


१. इंग्रजांचे पत्र " शिवाजी महाराज यांचा मृत्यू रक्तातीसाराने झाला. "
२. पारसी कागदपत्र ( मासिरे आलमसिगरी - साकीमुस्तेखान ) " शिवाजी हे घोड्यावरून उतरले त्यांना अतिउष्णतेमुळे दोन वेळा रक्ताच्या उलट्या झाल्या. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला "
३. निकोलोमनुची ( असे होते मोगल ) - " शिवाजीराजे यांना रक्ताच्या उलट्या होऊन मरण आले "
४. दाघ रजिस्टर ( डच कागदपत्र - १६८० (पृष्ठ ७२४.२९) संदर्भ परयीच्या दृष्ठी. ) - " राज्यांवर विषप्रयोग केला असावा "                   शिवाजीराज्यांनी राजारामाचा विवाह १५ मार्च १६८० रोजी प्रतापराव गुजर यांचे मुलीशी लाऊन दिला आणि अवघ्या १८ दिवसात शिवाजीराजे यांचा खून झाला. शिवाजीराजे रक्ताच्या उलट्या होऊन मरण पावले हे सारे जाणतात पण त्यांना रक्ताच्या उलट्या का झाल्या ? हे मात्र सारेच जाणत नव्हते कारण ब्राह्माण मंत्र्यांनी रायगडावरून वाराही बाहेर जाणार नाही याप्रकारे बंदोबस्त केला होता.


                                  


आता आपण मराठी -संस्कृत साधने पाहू :----


१. शिवदिग्विजय - " सोयराबाईंकडून राज्यांना विषप्रयोग झाला "
२. चिटणीस बखर - " सोयराबाईवरच आरोप ठेवते "
३. जेधे शकावली - " चैत्र शुद्ध शनिवार दिवसा दोन प्रहरी रायगडावर शिवरायांचे निधन झाले हंबीरराव मोहिते यांनी मोरोपंत, अण्णाजी, प्रल्हादपंत यांना कैद केले."चिटणीस बखर,शिवदिग्विजय या १८१८ सालच्या असल्याने समकालीन नाहीत. पण त्या विषप्रयोग झाल्याचे बोलतात. ब्राह्माण मंत्र्यांनी विषप्रयोग केला पण सोयराबाई यांच्या नावाने अफवा पसरवली. हे वरील साधनांवरून लक्षात येते.


जेधे शकावली हि दैनंदिनी असल्याने स्पष्टीकरण नाही पण त्यात निधनानंतर लगेच मंत्र्यांना अटक केल्याचे स्पष्ट होत आहे. मंत्र्यांनी खून केला म्हणून त्यांना अटक केली असा स्पष्ट अर्थ निघतो.

बहुजन सामाज्याची दिशाभूल करण्यासाठी नंतर काही ब्राह्माण इतिहासकरांनी शिवरायांचा मृत्यू हा " गुडघी रोगामुळे " झाला अशी अफवा पसरवली. (पण मित्रहो जगाच्या इतिहासात पूर्वी आणि आजही गुडघीरोग कोणालाही झाल्याचे उदाहरण नाही..) तर काही इतिहासकारांनी शिवरायांचा खून हा सोयराबाई यांनी केला असा कुप्रचार सुरु केला.
याचा स्पष्ट अर्थ काय निघतो ब्राह्माण हे अफवा पसरवण्यात, दिशाभूल करण्यात, कपटकारस्थानात, खून पचवण्यात जगात एक नंबर आहेत.


राज्यांचा खून पचावायासाठी ब्राह्मण कंपूने अनेक अफवा पसरवल्या. जनतेला खरे गुन्हेगार समजू नयेत खरे आरोपी सुटावेत यासाठी आजही ब्राह्माण खोटा प्रचार, दिशाभूल करत असतात.


शिवरायांचा खून पचउन स्वराज्य हस्तगत करायचा ब्राह्माण मंत्र्यांचा डाव होता त्यासाठी त्यांनी राजाराम यांचा राज्यभिषेक घाई घाईत उरकला.


कारण राजाराम हे १० वर्षाचे बालक होते. राजारामला नामधारी राजा करायचे व राज्यकारभाराची सर्व सूत्रे आपल्या हातात घ्यायची असा ब्राह्मण मंत्र्यांचा डाव होता. तसेच संभाजीराजे हे हुशार, धाडसी,पराक्रमी, होते म्हणून संभाजीराजे यांना अटक करायला मोरोपंत, अण्णाजी, प्रल्हादपंत हे पन्हाळागडाकडे निघाले पण वाटेतच या कपटी, स्वराज्यद्रोही, नरपशूना.... स्वराज्यप्रेमी, शिवभक्त, राजाराम यांचे सख्खे मामा हंबीरराव मोहिते यांनी अटक केली आणि संभाजीराजे यांचा रायगडावर अभीषेक केला. !


तात्पर्य :-

                  विषप्रयोग झाला हे सारे जाणतात. काही ब्राह्मणी विचारांना बळी पडून सोयराबाई ही यात सामील होत्या असे समजतात. पण त्याच वेळी शंभूराज्यांनी सोयराबाई यांना कधीच अटकही केले नाही व कोणताही त्रास दिला नाही उलट खुणानंतर ५-६ महिन्यांनी संभाजीयांनी सोयराबाई यांना गौरवले त्याचा सन्मान केला  ! याचा वर पुरावा दिलेला आहे. म्हणजेच सोयराबाई या निर्दोष होत्या हे कोणीही खरा शिवप्रेमी कबुल करेल. म्हणजेच शिवरायांचा खून हा केवळ स्वराज्य बळकावण्यासाठी ब्राह्माण मंत्र्यांनी केलेला ब्राह्मणीकावा होता हे सिद्ध होते.


--------------------------------------------------------------------------------------तरीही काही लोक खालील शंका उपस्थित करू शकतात :------> १. शिवरायांवर विष प्रयोग झाला का ?------> परिस्थिती तशीच आहे.


सुरवातीला आपण अमराठी साधने पाहूयात ......
१. इंग्रजांचे पत्र " शिवाजी महाराज यांचा मृत्यू रक्तातीसाराने झाला. "
२. पारसी कागद पत्र ( मासिरे आलमसिगरी - साकीमुस्तेखान ) " शिवाजी हे घोड्या वरून उतरले त्यांना अतिउश्नते मुळे दोन वेळा रक्ताच्या उलट्या झाल्या. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला "
३. निकोलो मनुची ( असे होते मोगल ) - " शिवाजीराजे यांना रक्ताच्या उलट्या होऊन मरण आले "
४. दाघ रजिस्टर ( डच कागदपत्र - १६८० (पृष्ठ ७२४.२९) संधर्भ परयीच्या दृष्ठी. ) - " राज्यांवर विष प्रयोग केला असावा "


वरील अमराठी साहित्य काय सांगते ?
शिवरायांना रक्ताच्या उलट्या झाल्या. हे कोणीही टाळू शकत नाही. शिवाजीराज्यांनी राजारामाचा विवाह १५ मार्च १६८० रोजी प्रतापराव गुजर यांचे मुलीशी लाऊन  दिला  आणि अवघ्या १८ दिवसात शिवाजीराजे यांचा मृत्यू झाला तोही रक्ताच्या उलट्या होऊन ! शिवाजीराजे रक्ताच्या उलट्या होऊन मरण पावले हे सारे जाणतात................. पण त्यांना रक्ताच्या उलट्या का झाल्या ? याचे उत्तर ब्राह्मणीसाहित्य त्यांचे भाषेत देते..
---------->


१. शिवदिग्विजय - " सोयराबाईंकडून राज्यांना विषप्रयोग झाला "
२. चिटणीस बखर - " सोयराबाईवरच आरोप ठेवते "


निष्कर्ष काय निघतो :--
१. कि सारे म्हणतात रक्ताचा उलट्या झाल्या.
२. दाघ रजिस्टर म्हणते विषप्रयोग झाला.
३. ब्राह्मणी साहित्य हि स्वीकारते कि विषप्रयोग झाला ! पण तो सोयराबाई यांनी केला !!


यातील कोणाकडे काहीही पुरावा नाही म्हणू हा गोंधळ होत आहे.

                   पण हे उघड आहे कि राजाराम यांचे लग्न झाले आणि १८ दिवसात शिवाजी वारले. लग्ना वेळी ते तंदुरुस्थ होते. कोणताही असाध्य रोग नव्हता. मग अचानक रक्ताच्या उलट्या का झाल्या ? या प्रश्नाचे उत्तर हेच आहे कि विषप्रयोग झाला.
2. मग नवीन प्रश्न निर्माण होतो कि तो कोणी केला ?

            त्यासाठी आधी रायगडावर त्याप्रसंगा आधी परिस्थिती कशी होती हे पाहावे लागेल
रायगडावर शिवरायांचे घरात गृहकलश सुरु होता !! शिवाजी महाराज हे कोणी साधारण व्यक्ती नव्हते. महाराजांसारखे कुशल पारखी यांचे घरात गृहकलश !
          ज्यांनी संपूर्ण भारतीय मूलनिवासी जनतेला एक जुठ केले , अनेक कुटुंबातील वाद आपल्या दरबारात योग्य न्यायाने मिटवले त्या महाराजांचे घरात गृहकलश !!! छे छे हे मनाला अजिबात पटत नाही ... ज्यांनी अफजलखानसारख्या महाकाय श्वापदाच्या आणि औरंगजेबासारख्या कुशाग्र बुद्धी असणाऱ्या बादशाच्या हातावर तुरी दिल्या. त्या महाराजांना आपल्याच घरातील वादावर हतबल व्हावे  लागले हे मनाला पटत नाही. पण काय करणार भावना या भावनेच्या जागी राहतात आणि वास्तव हे वास्तव असते...... आणि वास्तव हेच आहे कि महाराज यांचे घरात गृहकलश होता !


गृह कलश होता हे वास्तव जड अन्तःकारणाने स्वीकारले तरी काही नवीन प्रश्न निर्माण होतात.गृहकलश काय होता ? त्याचे कारण काय ?
सोयराबाई यांना संभाजीराजे हे छत्रपती होणे पसंत नव्हते ! का ? तर त्यांचा १० वर्षाचा मुलगा त्यांना तेथे हवा होता !! पण राज्याभिषेकावेळी तर असे काही झाले नाही........ मग आताच का असे व्हावे  कारण सोयराबाई यांचे मनात कोणीतरी विष कालवले..... मग हे विष कालवणारे कोण होते ? त्यांनी असे का केले ?
              ते होते ब्राह्मणमंत्री........अण्णाजी दत्तो हे या कटाचे मुख्य सूत्रधार होते !!!! अण्णाजी दत्तो.. ज्या माणसाने एक दोन वेळा स्वराज्यसाठी तलवार हि उचलली तो अण्णाजी ! असे का वागला ?

कारण :---------->
A)संभाजी महाराज यांनी एक वेळा या आण्णाजीने केलेला भ्रष्टाचार उगडा केला होता ! त्याची बोच या अण्णाजी दत्तोच्या काळजात गेली होती.
B ) अण्णाजी दत्तोची विवाहित मुलगी हिचे संभाजी महाराज यांचे वर प्रेम होते ती त्यांचेकडे आकर्षित झाली होती. आणि त्यातून एक प्रसंगी तिने संभाजीराजे यांचे महालात जाऊन इच्छा व्यक्त केली होती. पण "पराविया नारी राखूमाई समान" या तुकोबांच्या विचारांशी नाते असल्याने व तसे संस्कार जिजाऊनी व शिवरायांनी केलेले असल्याने संभाजी महाराज यांनी तिला महालातून हाकलून दिले. त्यामुळे तिने स्वतःच्या कृतीचा पश्चाताप झाल्याने आत्महत्या केली. असे बरेच प्रसंग येथे देता येतील पण या दोन प्रसंगा वरून दत्तो का दात खाउन होता हे लक्षात येते.

           शिवरायांवरील विषप्रयोगा आधीही ब्राह्मणमंत्री यांनी बरेच वेळा शंभू महाराज यांना बदनाम करणे व संपवण्याचा प्रयत्न केला होता. सोयराबाई आधी त्यांनी शिवरायांचे मनात विष कालवायचे अनेक प्रयत्न केलेले होते.
तसेच शंभू महाराज यांना संपवण्याचे ही प्रयत्न याच मंत्री लोकांनी केले होते. सविस्तर माहितीसाठी आपण संभाजी ही कादंबरी वाचा.
             तात्पर्य.....शिवरायांचे मंत्री हे कटकारस्थानी होते व त्यांनी संभाजी महाराज जिवंत असताना ही अनेक कारस्थाणे केली आणि ते शहीद झाल्यावर कारस्थानांचा वारसा त्यांचे वंशजांनी चालू ठेवला.

आता कोणालाही वरील शंका नसावी. मराठा सामाज्याचा सर्वात मोठा प्रोब्लेम हा आहे कि आम्ही स्वतः कधी ही वाचन करत नाही ब्राह्मण सांगतात आणि आम्ही ऐकतो. आणि ब्राह्मण ही मोठे धूर्त असतात ते ही असे काही असत्य बिंबवतात कि सत्य हे बरोबर त्या उलट सापडते.......
                       वर सिद्ध होते कि ब्राह्माण मंत्री यांनी पहिल्यांदा शिवरायांचे मनात विष कळवायचा प्रयत्न केला. पण शिवराय यांचे स्वतःच्या पहिल्या मुलावर, स्वराज्याच्या भावी छत्रपतीवर प्रेम होते आणि असणार तसेच शिवराय हे दुसर्याचे ऐकणारे नव्हते , कान चुगल्याना बळी पडणारे नव्हते त्या मुळे धूर्त ब्राह्मण मंत्री यांचा हा प्रयोग फसला !


आता या मंत्री लोकांनी मोर्चा वळवला तो सोयराबाई यांकडे. सोयराबाई या सरळमार्गी,साध्या-भोळ्या,स्फटिक मनाच्या होत्या त्यांना या ब्राह्मण मंत्र्यांच्या चाणक्यानीतीचा ठाव नव्हता. त्यामुळे त्या सुरवातीला या मंत्र्यांच्या कानचुगल्याना बळी पडल्या !!!


काही वेळ शिवरायांचे कुटुंबात वाद निर्माण झाला पण त्याला हे मंत्री जबाबदार होते. यासाठी पुरावा म्हणू संभाजीराजे यांचे पत्र घ्या.


संभाजीराजांचे 24 डिसेंबर 1680चे पत्र उपलब्ध आहे. त्यात ते म्हनतात ..
."राणीचे (सोयराबाईचे) मन स्फटिकासारखे निर्मळ होते. पण कुटिल मंत्र्यांनी दुष्ट सल्ला दिला की मोठ्या मुलाला गादी मिळता कामा नये. या सल्ल्याचा प्रभाव तिच्यावर पडला. "
आता हे स्पष्ट दिसत आहे कि शिवरायांचे घरात आणि संभाजीराजे यान वरील सर्व कटकारस्थानात फक्त आणि फक्त ब्राह्मण मंत्री होते ते अनेक वर्षापासून असे डाव आखत होते. त्या मंत्री गणाचे प्रतिनिधीत्व हे अण्णाजी दत्तो करत होते.आता पुढे प्रश्न निर्माण होतो तो काय ब्राह्मण मंत्री यांचे चाणक्यनीतीला बळी पडलेल्या सोयराबाई या विषप्रयोगात सामील होत्या ? काय त्यांना याची पुसटशी हि कल्पना होती ?


---->  नाही ते शक्य नाही कारण "राणीचे (सोयराबाईचे) मन स्फटिकासारखे निर्मळ होते." असे खुद्द शंभू राजे बोलतात. अशी स्त्री असे करणे शक्य नाही. उलट त्यांना असा कट माहित असता तर त्यांनी पुढील घटना रोकली असती हे उघड आहे.


मग राहतात ते अण्णाजी दत्तो आणि त्यांचे सहकारी. बाकी कोणावर हि संशय घेता येणे शक्य नाही.


3. शेवटी आणखीन एक प्रश्न ब्राह्माण भक्त करतील कि अण्णाजी दत्तो यांनी फार चुका केल्या हे कबुल पण काय ते शिवरायानवर विषप्रयोग करतील ?
---> हो ते करू शकतात.
कारण त्यांनी संभाजी महाराज यांवर विषप्रयोग केल्याचे इतिहासात दाखले आहेत पण ते फसले.
त्यांनी केलेल्या अनेक  गुन्हे शंभू महाराज यांनी माफ करून हि अण्णाजी आणि कंपूने शिवरायांचे स्वराज्य हे मोगल पुत्र अकबराला विश्वासात घेऊन वाटून घेण्याचा कट केला होता. आणि आम्ही संभाजीला संपवायला तुम्हाला मदत करतो अश्या आशयाचे पत्र हि लिहिले होते मोगल पुत्राला ! पण त्यांचे दुर्दैव मागील कटात त्यांनी हंबीरराव यांना फितावण्याचा प्रयत्न केला व हंबीरराव यांनी त्यांनाच धडा शिकवला आता त्यांनी मोगल पुत्राला स्वराज्य वाटून घेण्याचे आमिष दाखवले पण याही वेळी मोगल पुत्र तडक शंभू राज्यांना हे पत्र देऊन मोकळा झाला ! आणि या शिवद्रोह्याना हत्तीचे पाया खाली द्यावे लागले.

sambhaji maharaj death history in marathi language

आता तुम्हीच विचार करा :--
१. ज्या लोकांनी शिवरायाची शेवटची इच्छा (म्हणजे शंभूराजे यांना गादी
वर बसवणे ) पूर्ण करायचे सोडून शंभूराज्यांना कैद करायचा  कट केला.२. एवडे होऊन हि शंभूराजे यांनी काही दिवस कारावास देऊन यांना मोकळे केले तर यांनी पुन्हा शंभू हत्तेचा कट केला. त्यातून सुटले
३. परत यांनी शिवरायांचे स्वराज्य मोगलाला फुकट वाटून देण्याचे पत्र दिले व शंभू महाराज यांना संपवण्याची इच्छा केली.

हे शिवरायांचे भक्त असतील का ? यांनी शिवरायांवर विष प्रयोग केला असणे शक्य नाही का ?

Author
Avinash jadhav


Popular posts from this author

96 kuli maratha in marathi

96 kuli maratha list in marathi मराठा समाजाची सर्व ९६ कुळे..त्यांच्या पूर्ण इतिहाससह...नक्की वाचा..! भाग-१ भाग-१ : मराठा समाजाची सर्व ९६ कुळे..त्यांच्या पूर्ण इतिहाससह...नक्की वाचा..! This post is translation of english to marathi. 96 kuli maratha surnames list in marathi.  If you found any mistake please inform us and double check for more information , 96 kuli maratha list  खालील post मध्ये ज्या ९६ कुळी मराठा 96 kuli Maratha "आडनावांचा" समावेश आहे.. त्यामध्ये अनेक आडनावे नाहीत तर कारण असे कि, या आडनावांचे अनेक उप-प्रकार आहेत..त्यामध्ये त्यांचा समावेश आहे..खाली सर्व माहिती दिली आहे..आवर्जून वाचा.. त्यामध्ये आडनावाशिवाय इतर त्यांचे साम्राज्य.गोत्र,कार्य,कुलदैवत..आदी माहिती दिली आहे.. "इतिहास जाणण्याची उत्सुकता असेल तर नक्की आपले आडनाव शोधा...माहिती भेटेल...” henna designs for hands कुळ प्रणालीची उत्पत्ती मुख्य वसाहती आणि त्यांच्या उप-कुळे किंवा रेषा वेळोवेळी वेगळे असतात आणि पुस्तकाने पुस्तक. काही गटांनी आपली वैभव आणि राज्य गमावले

96 kuli maratha list

96 kuli maratha list or 96 kuli maratha surname list  ९६ कुळी मराठा मराठा समाजाची सर्व ९६ कुळे..त्यांच्या पूर्ण इतिहाससह...नक्की वाचा..! भाग-१ भाग-१ : मराठा समाजाची सर्व ९६ कुळे..त्यांच्या पूर्ण इतिहाससह...नक्की वाचा..! खालील  post  मध्ये ज्या  ९६ कुळी मराठा  "आडनावांचा" समावेश आहे.. त्यामध्ये अनेक आडनावे नाहीत तर कारण असे कि ,  या आडनावांचे अनेक उप-प्रकार आहेत..त्यामध्ये त्यांचा समावेश आहे..खाली सर्व माहिती दिली आहे..आवर्जून वाचा.. त्यामध्ये आडनावाशिवाय इतर त्यांचे साम्राज्य.गोत्र , कार्य , कुलदैवत..आदी माहिती दिली आहे.. " इतिहास जाणण्याची उत्सुकता असेल तर नक्की आपले आडनाव शोधा...माहिती भेटेल. ..” Check  96 kuli maratha in marathi